खा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी !

वृद्ध व्यक्तीवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अहमदनगर :- महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुरी तालुक्यातील केंदळ येथे एक भूमीपूजन समारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. गावातील एका मंदिराजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.खा. दिलीप गांधी यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी केंद्राच्या विविध योजना आणि इतर कामे सांगण्यास सुरुवात केली.

त्याचवेळेला या ठिकाणी असलेले गृहस्थ यांनी खासदार गांधी यांचे भाषण थांबवून साहेब तुमचे सरकार आहे, महागाई वाढली आहे, आमची पेन्शनही वाढवा, अशी मागणी केल्यावर खासदार दिलीप गांधी यांना आपला राग अनावर झाला.

खासदार साहेबांनी उत्तर दिलं, की “सर्वात जास्त दिलीप गांधींनी मदत केली आहे… ओ नीट बोलायचं हा…शांतपणे बोला.. ही काय पद्धत आहे तुमची… हे म्हणतात महागाई वाढली.. डाळ काय भाव आहे. किती रुपये भाव आहे?” असे प्रश्‍न गांधींनी विचारले.

वारंवार वादग्रस्त वक्तव्याने खासदार दिलीप गांधीचं यावेळंच तिकीट धोक्यात असल्याचं बोललं जातंय. त्यातच पुन्हा एकदा हा प्रकार समोर आलाय. मनपा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर भरसभेत गांधी यांनी मतदारांना दमबाजी केली होती. त्यानंतर आता दिलीप गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

728 X90 Jeep Car