वर्ल्ड टिचर फोरमची स्थापना.

डॉ.अमोल बागूल यांचा १५३ देशातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणण्याचा उपक्रम

अहमदनगर :- शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार असतो. समाज व माणूस घड़विताना इतर संस्कृतींबरोबरच शैक्षणिक संस्कृती देखील विकसित होत असते.

जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रादेशिक परिस्थितींमध्ये अध्ययन अध्यापनाच्या अनोख्या शिक्षण संकल्पना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन नवशिक्षकांनी नवसर्जनाचे सुलभक व्हावे म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त व जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेता कलाकार व हरहुन्नरी शिक्षक डॉ.अमोल बागूल यांनी “वर्ल्ड टिचर फोरम”ची स्थापना केली असून १५३ देशातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणण्याचा उपक्रम राबवतांना देश व राज्यातील उपक्रमशील शिक्षकांना या फोरममध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शाळांमधून ICT चा प्रभावी वापर,नवोपक्रम, वंचितांचे शिक्षण, गुणवत्तेतील परिवर्तनवादी प्रयोग, बुक बँक,ऑडिओ-व्हीडीओ लायब्ररी,ई-पाठशाळा,जगावेगळे शैक्षणिक उपक्रम,शैक्षणिक ई-साहित्य निर्मिती,व्यक्तिमत्व विकास,सुलभ परीक्षा पद्धती,अत्यावश्यक कोर्सेस,कला प्रशिक्षणे,आर्थिक स्त्रोत निर्मिती, त्याचबरोबर गूगल,माइक्रोसॉफ्ट,डिस्कवरी चॅनेल सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांच्या शिक्षकांसाठीच्या स्पर्धाची तयारी, पियरसन शिक्षक पारितोषिक,ग्लोबल टिचर अवॉर्ड,राष्ट्र-राज्य पुरस्कारांसाठीची तयारी आदी घटकांबाबत फोरमच्या माध्यमातून प्रतिनिधी काम करणार आहेत.

शैक्षणिक संमेलने,ICT पुरस्कार,बेस्ट टिचर अवार्ड्स,सोशल टिचर अवॉर्ड, फ़लकलेखन स्पर्धा यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती डॉ. बागूल यांनी दिली आहे. फोरमसाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ति विनामूल्य नावनोंदणी करु शकते.

सोशल मिडियाचा प्रभावी शैक्षणिक वापर,उपक्रमशीलता, नवे शिकण्यासाठी चौकटीबाहेर पडून शैक्षणिक काम उभे करण्याचा उत्साह असणाऱ्या शिक्षकांसाठी वर्ल्ड टिचर फोरमचे सुमारे 100 व्हाट्सएप ग्रुप करण्यात आले आहेत.

मराठी हिन्दी इंग्रजी भाषेबरोबरच अनुवादकांच्या मदतीने इतर प्रादेशिक भाषामधुन संवाद साधला जाणार आहे. वर्ल्ड टिचर फोरम चे सदस्य होण्यासाठी 9595 54 5555 या व्हाट्सएप क्रमांकावर तसेच amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन फोरम च्या वतीने करण्यात येणार आहे

728 X90 Jeep Car