शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून १० हजार रुपये?

भाजप सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लवकरच पॅकेज

वृत्तसंस्था :- पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच पॅकेज देण्याच्या प्रयत्नात आहेत. येत्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी १० हजार जमा करणार आहे. ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा येत्या २६ जानेवारीला होवू शकते.

या योजनेबाबत अर्थ आणि कृषी मंत्रालयात चर्चा सुरू आहेत. ओडिशा सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करते. या योजनेसाठी राज्याला १.४ लाख कोटी रुपयांचा खर्च येतो.

केंद्र सरकारच्या योजनेत सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याची शक्यता आहे. या योजनेतून भूमीहिन शेतकऱ्यांना वगळण्या येण्याची शक्यता आहे.

भूमीहिन शेतकऱ्यांवर शेत कर्ज नसल्याचा तर्क यासाठी देण्यात आला आहे. केंद्र सरकार नवीन ग्रामीण पॅकेज योजनेवर विचार करत आहे.

728 X90 Jeep Car