कर्जत जामखेड मधून रोहित पवार निवडणूक लढवणार ?

राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणे आवश्‍यक - रोहित पवार.

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात आता खासदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी कर्जत – जामखेडच्या दौर्यात केले आहेत.

पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे जामखेड तालुक्‍यातील चोंडी दौऱ्यावर आले होते.

कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे विचारले असता, पक्षाने जबाबदारी व संधी दिली तर कार्यकर्ता म्हणून मी ती नक्कीच पुढे नेईन, असेही सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

आज मतदारसंघात संवाद साधण्यासाठी आलो आहे. लवकरच चर्चेसाठी येणार आहे. त्यावेळी मोठी सभा घेऊ, असे सांगत रोहित पवार यांनी सांगितले.

सरकारविरोधी जनमत तयार होऊ लागल्याने जाती जातीत, धर्मा – धर्मात तेढ निर्माण करण्याचे उद्योग सरकारने सुरू केले आहेत. राज्यात व देशात भाजपाची पुन्हा सत्ता आल्यास समतेचा विचार हरवेल असे सांगत

समतेचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर देशात व राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

728 X90 Jeep Car