कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी.

तीन वर्ष सक्तमजुरी व 75 हजार रुपये दंड.

नेवासा :- 2014 साली शेतामधून जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून सांगीतल्याचा राग आल्याने एकास कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ए. एल. टिकले यांनी विलास श्यामराव कर्डिले (रा. जेऊर हैबती ता. नेवासे) याला दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

फिर्यादी कर्डिले यांना शेतात जाण्यासाठी रस्ता होता. परंतू आरोपी विलास कर्डिले, श्यामराव कर्डिले व हिराबाई कर्डिले यांनी विरोध करून तेथे कडवळ पेरले होते. परंतू फिर्यादी यांना रस्ता मोकळा करून द्या, असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपीने कोयत्याने फिर्यादीच्या मारहाण करून गंभीर जखमी केले होते. 

घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरोदे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. 

न्यायालयाने आरोपी विलास शामराव कर्डिले याला तीन वर्ष सक्तमजुरी व 75 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावली तर श्यामराव बाळाजी कर्डिले व हिराबाई शामराव कर्डिले यांची निर्दोष मुक्तता केली.
728 X90 Jeep Car