नगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशात आणि राज्यात भाजप विरोधी आघाडी करण्यात पुढे असलेल्या शरद पवारांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत ‘जातीयवादी’ भाजपला पाठिंबा दिला.

स्थानिक नेत्यांची भाजपला साथ.

राज्यात या बाबत चर्चा होतात सर्वानीच हात झटकले. महापौर निवडीत झालेल्या ह्या अभद्र युतीबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली.

खुद्द पवारांकडून कारवाई करण्याचा इशारा

या प्रकरणी जयंत पाटलांनी नगरसेवकांना नोटीसही बजावली होती. शरद पवारांच्या नगर दौऱ्यात आमदार जगताप पितापुत्र दिसले नाहीत, शिवाय खुद्द पवारांनाही ह्याबाबत कारवाई करण्याचा इशारा पत्रकारपरिषदेत द्यावा लागला.

शिवसेनेकडून होणारा त्रास…

पक्षाने ह्या १८ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस दाखवून रीतसर खुलासा मागितला,नगरसेवकांसह आमदारांनीही ‘लेट’ खुलास दिला, ज्यात शिवसेनेकडून होणारा त्रास ह्याच एका कारणातून पाठींबा दिल्याचे कारण देण्यात आले.

त्या नगरसेवकांसह जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी !

अखेर आज भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं, पक्षाचा आदेश न पाळल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. तसेच शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

जगताप पिता पुत्रांवर कोणतीही कारवाई नाही…

मात्र राष्ट्रवादीने ही कारवाई करुन नगरसेवकांना बळीचा बकरा बनवलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण, राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरसेवकांची हकालपट्टी केली असली तरी ह्या सर्व नगरसेवकांचे बॉस अर्थात आमदार जगताप पिता पुत्रांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

फक्त दिखाव्यासाठी ही कारवाई ?

खरे तर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुण जगताप यांना अभय देण्यात आलं,फक्त दिखाव्यासाठी ही कारवाई करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

नगरसेवकांना बळीचा बकरा बनवल ?

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील व विधान परिषदेतील आमदार अरुण जगताप यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही भाजपला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला असल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नगरसेवकांवर कारवाई करुन नगरसेवकांना बळीचा बकरा बनवल का हा प्रश्न पडतो.

त्यामुळे तर दोघांना अभय दिलं नाही ?

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने आणि नगर शहरात आमदार जगताप घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे पक्षातून त्यांची हकालपट्टी केली तर दोन्ही जागांवर पक्षाला ‘तोटा’ होवू शकतो त्यामुळे तर दोघांना अभय दिलं नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Leave a Comment