शुल्लक कारणातून राडा,माजी उपसरपंचाला मारहाण.

शेवगाव तालुक्यातील घटना,उपसरपंच जखमी.

शेवगाव :- तालुक्यातील माजी उपसरपंच रवींद्र माणिक घायतडक यांना धारदार शस्त्राने भोसकून जखमी करण्यात आले. ही घटना राक्षी येथील सुमनताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निकच्या आवारात बुधवारी घडली आहे. 
पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.अनिल गंगाधर गर्जे, महेश बंडू गर्जे, ऋषिकेश भारत गर्जे, ऋषिकेश नानासाहेब गर्जे, सचिन बारगजे व एक व्यक्ती अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून . ऋषिकेशला अटक करण्यात आली. 
महाविद्यालयातील कनिष्ट लिपिक राजेंद्र घायडतडक यांचा स्कार्पिओच्या चालकाशी वाद झाल्यावर लाथाबुक्यांनी मारहाण केली, हे कळताच रवींद्र घायतडक घटनास्थळी आले. नितीन बारगजे याने रवींद्र घायतडक यांच्या पोटात धारदार हत्यार भोसकले.
728 X90 Jeep Car