शेतातील विद्युत तारेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू.

एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद.

अहमदनगर :- नगर तालुक्यातील नांदगाव येथे एका शेतातील विद्युत तारेचा झटका बसून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

शिवाजी वसंत जगधने (वय ३१ रा. पिंप्री अवघड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

विद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नांदगाव येथील शेतकरी दादू नाना जाधव यांच्या शेतीच्या बांदावर जगधने याचा मृतदेह आढळून आला.

रानडुकरे शेतात येऊन पिकाचे नुकसान करतात. रानडुकरे शेतात येऊन नये म्हणून शेतकरी बांधाला तारा लावून त्यात विद्युतप्रवाह सोडतात.

बांधावर विद्युत प्रवाहाचा झटका बसून जगधने याचा मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.

728 X90 Jeep Car