लंके प्रतिष्ठानच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे

...लंके यांच्या समाजभिमुख कार्यावर तरुणाई प्रभावित

पारनेर :- शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके प्रतिष्ठानचा राज्य पातळीवर विस्तार करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, राहुल झावरे सचिव, तर दादा शिंदे यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नीलेश लंके यांनी बुधवारी केली आहे.

…लंके यांच्या समाजभिमुख कार्यावर तरुणाई प्रभावित.

संघटना उभारणीसंदर्भात माहिती देताना सचिव अँड.राहुल झावरे यांनी सांगितले, नीलेश लंके यांच्या समाजाभिमुख कार्यावर प्रभावित होऊन नगर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण वर्ग संघटित झाला आहे. हे तरुण पारनेर व नगर तालुक्यात प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणारे उपक्रम आपल्या भागातही समर्थपणे राबवत आहेत.

राज्यभरातून तरुणांचा प्रतिसाद!

पुणे जिल्ह्यातील शिरूर, मुंबईत बोईसर, कुलाबा, ठाणे व नवी मुंबई येथे प्रतिष्ठानच्या शाखा हजारोंच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीने प्रतिष्ठानचा राज्यस्तरावर विस्तार करण्याचा एकमताने निर्णय घेतला.

जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे

दरम्यान, लंके प्रतिष्ठानच्या आक्रमक भूमिकेमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे,अनेक पक्षातील नाराज कार्यकर्ते आणि नेत लंके यांच्या संपर्कात असल्याचे समजते.