धनादेश देणे पडले महागात,कंत्राटदाराला तीन महिने कैद.

धनादेश न वटल्याने ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश.

कोपरगाव :- अमृत संजीवनी शुगर ट्रान्स्पोर्ट कंपनीसोबत काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विंचूर येथील ऊसतोडणी वाहतूकदार प्रकाश गंगाराम देसलेला धनादेश देणे महागात पडले आहे.

४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश.

देसले याने कंपनीकडून घेतलेली उचल रकमेची परतफेड केली नाही व त्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने कोपरगाव येथील न्यायदंडाधिकारी पी. एन. देशपांडे यांनी आरोपीस तीन महिने कैदेची शिक्षा व ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रकाश गंगाराम देसले (विंचुर, धुळे) याने ऊस वाहतुकीसाठी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून उचल घेतली होती. त्यापोटी त्याने धनादेश दिला, मात्र तो वटला नाही.

तीन महिने कैद आणि नुकसान भरपाई

या रकमेची परतफेड न केल्याने आरोपी प्रकाश देसले याच्याविरोधात फौजदारी न्यायालयात अमृत संजीवनीतर्फे विजय नरोडे यांनी दावा दाखल केला. त्याची सुनावणी होऊन प्रकाश देसले याला तीन महिने कैदेची शिक्षा व ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला.

728 X90 Jeep Car