गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक.

सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या आरोपींना अटक.

अहमदनगर :- गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री नगर तालुक्यातील सारोळाबद्दी गावाच्या शिवारात जामखेड रस्त्यावरील विश्वभारती कॉलेजजवळ करण्यात आली.

बब्बू लालभाई शेख (कानडगाव फाटा, ता. गंगापूर, औरंगाबाद) व रोहन कृष्ण पवार (निपाणी निमगाव, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. विश्वभारती कॉलेजजवळ काही व्यक्ती गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या आरोपींना अटक.

त्यांच्या पथकाने सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेतले. अक्षय मच्छिंद्र अदमाने (शिंगणापूर, ता. नेवासे) मात्र पळून गेला. अन्य दोघांची झडती घेतली असता ५० हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे व ८०० रुपयांची ४ जिवंत काडतुसे मिळाली.