स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अटक.

नेवासा तालुक्यातील घटनेने खळबळ.

नेवासा :- वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नेवासा तालुक्यातील देवगाव परिसरात घडली असून स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

स्वतः पीडित मुलीची फिर्याद.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील मातृछत्र हरपलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात स्वतः पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत पीडित मुलीने म्हटले की, तिची आई लहानपणी मयत झाल्याने तिचा सांभाळ आजीचं करत आहे. सध्या आजी, आजोबा, लहान भाऊ व वडिलांसह एकत्र राहतात.

2 जानेवारी रोजी रात्री तिच्या वडिलाने आजी बरोबर भांडण करून आजी व भावाला घराबाहेर काढले व मुलीला मारहाण करून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने विरोध केल्याने तिची सुटका झाली.

मुलीला मारहाण करून अत्याचार !

मात्र दि.3 जानेवारीला दुपारी दीड वाजता नराधम बापाने आजोबा व भावाला शेताकडे पाठवून पीडितेला घरात कोंडून मारझोड करत अत्याचार केला. त्या दिवसापासून दररोज दुपारी घरातील लोकांना शेतात पाठवून तो अत्याचार करत असे.

वडिलांच्या धाकाने ती प्रथम आजोबा-आजीला सांगू शकली नाही. मात्र 7 जानेवारी रोजी आजीला सर्व प्रकार सांगितला आणि मंगळवार दि. 8 जानेवारी रोजी नेवासा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. असून नराधम पित्यास अटक करण्यात आली आहे.

728 X90 Jeep Car