कर्जबाजारी डॉक्टराची गळफास घेवून आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती.

अहमदनगर :- केडगाव येथील कृष्णाईनगर येथे राहणा – या डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली .

अनेक दिवसांपासून मानसिक दबावाखाली

डॉ . रमेश सोमनाथ गव्हाणे ( वय ४५ ) असे आत्महत्या करणा – या डॉक्टरचे नाव आहे . | तारकपूर परिसरात डॉ . गव्हाणे यांचे क्लिनिक आहे . गेल्या अनेक दिवसांपासून ते मानसिक दबावाखाली होते. काल सायंकाळी ते रुग्णालय बंद करून घरी गेले . रात्री साडेआठच्या सुमारास घरातील छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

दरम्यान , या प्रकरणाची पोलिसांना रात्री माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . गव्हाणे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजली .

728 X90 Jeep Car