अहमदनगर मध्ये पुन्हा थंडीची लाट

तापमान ६.५ अंश सेल्सिअस वर !

अहमदनगर :- नगरमध्ये मंगळवारी पहाटे किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ही लाट दोन दिवस राहण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तविली आहे.

आणखी दोन दिवस लाट कायम

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची ती‌व्र लाट आली होती. जानेवारीच्या सुरुवातीलाही ती जाणवली. त्यानंतर मात्र थंडी कमी झाली होती. आता पुन्हा एकदा किमान तापमानात कमालीची घट झाली आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत थंडीची लाट आली आहे. आणखी दोन दिवस ही लाट कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.