नगर-मनमाड मार्गावर बैलगाडीला भरधाव कारची धडक.

ऊसतोड मजूर दाम्पत्य गंभीर जखमी.

राहुरी :- डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला स्विफ्ट कारची धडक बसल्याने ऊसतोड मजूर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. जखमींना प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर-मनमाड मार्गावरील जोगेश्वरी आखाडा परिसरात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला.

अपघातात कारचा झाला चक्काचूर…

शिवाजी किसवे व त्यांची पत्नी राधाबाई (टाकळीमानूर, तालुका पाथर्डी) हे उसाची वाहतूक करणारे मजूर बैलगाडीतून डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे ऊस भरून जात होते. भरधाव आलेल्या एमएच १२ जेयू ७५३ या कारची बैलगाडीला धडक बसली. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. बैलगाडीचे मोठे नुकसान झाले.

728 X90 Jeep Car