लवकरच नगरला ३०० कोटी मिळणार !

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ग्वाही.

 

अहमदनगर – सरकार महापौरांच्या पाठीशी असून मनपाला ३०० कोटी देणार आहोत. नगरला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दानवे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ३६ मतदारसंघांत दौरे केले आहेत. बुथस्तरापासून संघटन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आम्ही जेथे शब्द दिले ते पाळले आहेत.शुक्रवारी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी आदी उपस्थित होते.

त्यांचा पाठिंबा घेतला नाही, तर त्यांनी तो दिला – दानवे.

दानवे म्हणाले, महापौर व उपमहापौर भाजपचे झाले आहेत, त्याला आमची मान्यता आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नाही, तर त्यांनी तो दिला आहे. बसपच्या चार नगरसेवकांना पक्षात घेणार का? असे विचारले असता दानवे यांनी आले तर त्यांनाही घ्यायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले.

728 X90 Jeep Car