शहरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी

स्मारकासाठी प्रयत्न करण्याचे महापौरांचे आश्‍वासन

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शहरात स्मारक होण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मागणीचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले. वाकळे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा रेखा जरे पाटील, सुरेश बनसोडे, फारुक रंगरेज, दिपक खेडकर, रंजना उकिर्डे, जमीला शेख, मनिषा गायकवाड, सोमा शिंदे, सचिन अकोलकर आदि उपस्थित होते.

सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया समाजात रोवला. 

अनेक अडचणीवर मात करीत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया समाजात रोवला. यामुळे अनेक महिला उच्च पदावर विराजमान आहेत. अशा महान व्यक्तीमत्वाची जयंती साजरी होण्यासाठी शहरात एकही स्मारक नाही. खुर्चीवर फोटो ठेऊन त्यांना अभिवादन करण्याची वेळ येत असल्याची खंत रेखा जरे पाटील यांनी व्यक्त केली. तर त्यांचे स्मारक होण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी केली.
728 X90 Jeep Car