निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु

नगर तालुका मनसेच्या पाठपुराव्याला यश

अपघाताला कारणीभुत ठरणार्‍या निंबळक ते भाळवणी रस्त्याचे काम सुरु झाले असून, नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

या रस्त्याच्या कामाची पहाणी मनसेचे नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, सचिन निमसे, काशीनाथ चोभे, सयाजी गायकवाड, महेश निमसे, सचिन उमाप, विजू निमसे, विलास पानसंबळ, संतोष वाघमारे, योगेश निमसे, मोहंमद शफी काझी, राजू ससे, आकाश काळे आदिंसह कार्यकर्त्यांनी केली.

रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने समाधान.

निंबळक ते भाळवणी रस्त्याची झालेली दुरावस्था नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला निदर्शनास आनून दिली होती. रस्त्यावर वारंवार अपघात घडत असताना तातडीने दुरुस्तीची मागणी करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. तर या कामासाठी पाठपुरावा देखील केला. इसळकपासून पुढे सदर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल आहे.

728 X90 Jeep Car