यापुढेही मीच आमदार होणार - आ.विजय औटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मतदारसंघातील जनतेमुळे आमदार झालो, तर शिवसेना नेतृत्वाने विधानसभेच्या उपसभापती पदाची संधी दिली. नगर पारनेर मतदार संघातील जनता बरोबर असल्याने यापुढील काळातही मी आमदार असेन, असा विश्वास विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांनी व्यक्त केला.नगर तालुक्यातील जनतेच्या वतीने निंबळक येथे आयोजित सत्कार समारंभात औटी बोलत होते.

                           

औटी म्हणाले, पुढील निवडणूक लढवणार का ही शंका कोणी ठेवू नये. पुढील निवडणूक आपण लढवणार आहोत व जनता बरोबर राहणार असल्याने निवडूनही येऊ. त्याची काळजी कोणी करू नये. अनेकांना झोपेत स्वप्ने पडत आहेत. 


Loading...
पण आपण या मतदारसंघात केलेल्या कामाची दखल तालुक्यातील जनतेने दोनवेळा घेतली आहे. माझी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघाचाही गौरव केला आहे. विधानसभेत दुष्काळ असो अंगणवाडी सेविकांसाठी लागू केला जाणारा जाचक कायदा असो. अथवा राजीव गांधी निराधार पेन्शन योजना असो, यासाठी वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवला आहे. 

मतदारांची कामे होणार असतील, तर स्पष्टपणे होईल म्हणून सांगतो; अन्यथा नाही म्हणतो. परंतु केवळ हेलपाटे मारण्यासाठी कोणाला झुलवत ठेवणे आपल्याला जमत नाही. गप्पा मारण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. परंतु ज्या ठिकाणी कामे केली जातात त्या ठिकाणी माणसे अडवून ठेवण्याची आपली पद्धत नसल्याचे त्यांनी सागितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.