कारच्या धडकेत एकजण ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव शिवारात एका स्विप्ट डिझायर कारने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने अशोक साखर कारखान्याचा एक कर्मचारी जागीच ठार झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Loading...

तालुक्यातील खिर्डी येथील पोपट मारुती विटनोर (वय ४५) हे अशोक कारखान्यामध्ये अकाऊंट विभागामध्ये कामास होते. काल सायंकाळी कामावरुन सुटल्यानंतर ते आपल्या मोटारसायकलवरुन खिर्डी येथे घराकडे जात असताना त्यांना कारेगाव शिवारात एका स्विप्ट डिझायर कार चालकाने समोरून जोराची धडक दिली.


या झालेल्या अपघातात पोपट विटनोर हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पहाणी करुन पंचनामा केला. नंतर पोपट विटनोर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला होता. या

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.