अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शाळा सुटल्यानंतर घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. कुंडलिक रामजी रावते असे आरोपीचे नाव आहे. 


Loading...
अकोले तालुक्यातील जनतेचे या खटल्याकडे लक्ष लागले होते. अकोले तालुक्यातील खिरविरे येथे हा प्रकार घडला होता. शाळा सुटल्यानंतर ही मुलगी सायंकाळी घरी परतत असतानारावते ज्याने तिला रस्त्यात अडवत मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगितले. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुलगी पुढे निघून गेली. 

त्याने पाठीमागून येत तिला पकडले. तिने आरडाओरडा करण्यापूर्वी त्याने तिचे तोंड दाबले. त्यानंतर जवळच्या खड्ड्यात नेत तिच्यावर अत्याचार केले. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर या मुलीने घरी जात घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी मुलीला घेऊन अकोले पोलिस ठाण्यात रावते याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 


लगेचच आरोपीला अटक करण्यात आली. संगमनेरचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी या प्रकरणाचा तपास करत जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. इनामदार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. 


सरकार पक्षाच्या वतीने वकील संजय वाकचौरे यांनी न्यायालयासमोर सरकार पक्षाची बाजू मांडली. या खटल्यामध्ये एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरला. 

याशिवाय अत्याचारित मुलीची साक्ष, तिच्या आईची साक्ष, फिर्यादी आदींच्या साक्षीदेखील महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार आणि आणि आरोपीच्या वतीने बचाव पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश इनामदार यांनी आरोपीला दोषी ठरवत विविध कलमांखाली सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.