मोटारसायकलीला टँकरची धडक बसून पिता-पुत्र ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुलाला शाळेत सोडवण्यासाठी चाललेल्या पित्यासह मुलाला भरधाव वेगात चाललेल्या पाण्याच्या टँकरने चिरडले. दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. सतीश कसबे (वय४०) व सौरव सतीश कसबे (वय १५, आपधूप) अशी त्यांची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील सुपे-वाळवणे रस्त्यालगत आपधूप फाट्यावर वीज उपकेंद्राजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. 


Loading...
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या सौरवला सोडण्यासाठी सतीश हे मोटारसायकलीवरून सुप्याला चालले होते. पाणी भरण्यासाठी येत असलेल्या टँकरची (एमएच ०४. सीए ९४७५) त्यांच्या मोटारसायकलीला जोराची धडक बसल्याने पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत झाला. 

अपघाताचा आवाज ऐकून कोल्हे वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सतीश कसबे यांच्यावर घरातील सर्वांची जबाबदारी होती. अतिशय गरीब परिस्थिती असल्याने ते रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. त्यांच्यामागे एक मुलगी, दोन भाऊ, वडील, बहीण असा परिवार आहे.

सुपे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने करत आहेत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.