आदर्शगाव लोहसरच्या माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आदर्शगाव लोहसर येथे शुक्रवारी सशस्त्र हल्ला करून देवेंद्र गिते व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. रोख रक्कम व दागिने मिळून ५५ हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. गिते यांच्या नातेवाईकांनी नगरच्या सुमेध साळवे याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू अाहे.
Loading...

गुरुवारी फेसबुकवरून बबलू ऊर्फ बाळासाहेब गिते याने देवेंद्र गिते यांना यमराज कधी सांगून येत नाही. मी तुला कधीही घरात घुसून मारेन, अशी धमकी दिली. शुक्रवारी सकाळी देवेंद्र गिते हे शेतातील घरात असताना स्कार्पिओ (एमएच १६ बीएच ७४३९) व पल्सर (एमएच १६ बीआर ९२) व अन्य दोन मोटारसायकलींवरून आरोपी आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते.

गहिनीनाथ गिते याने घरात घुसून पेटीत ठेवलेले ३५ हजार रुपये नेले. आरोपींना पकडण्यासाठी मागे धावल्यावर त्यांनी दांडे, दगडांनी नामदेव गिते, बाळासाहेब गिते, रावसाहेब गिते व पांडू गिते यांना मारहाण केली. बबलू गिते याने बाळासाहेब गिते त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून धरत आम्हाला सरपंचाचा पाठिंबा आहे, तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकी दिली.

फिर्यादीचे नातेवाईक मदतीसाठी धावून आल्यावर आरोपी पळाले. फिर्यादीच्या नातेवाईकांनी गाड्यांची तोडफोड केली. आदर्श गाव म्हणून गवगवा झालेल्या गावाच्या सरपंचाविरुद्ध फिर्यादीत आरोप झाल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त तैनात करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.