१२ वर्षांच्या चिमुकलीवर नराधम पित्याने केला बलात्कार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपल्या १२ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याच्या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली. ४ डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील ब्राह्मणी येथे ही घटना घडली.
Loading...

या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने शुक्रवारी फिर्याद दिल्यावर या नराधमास पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले. त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने या विकृत गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.