एकहाती सत्ता द्या नगर शहराचा चेहरामोहरा बदलुन टाकू - मुख्यमंत्री फडणवीस.

File Photo
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता द्या, मनपातील सत्ताधार्‍यांच्या पाठीशी मी स्वत: उभा राहून नगर शहराची दशा व दिशा बदलून टाकून नगरला आधुनिक चेहरा दिला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 
Loading...

पालकमंत्री राम शिंदे, पक्षाचे संघटकमंत्री रघुनाथ कुलकर्णी, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.मोनिका राजळे, आ.शिवाजी कर्डिले, आ.सुरेश धस, बबनराव पाचपुते, भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, सुनील रामदासी, गौतम बेरड, गौतम दीक्षीत, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, अभय आगरकर, संभाजी दहातोंडे व सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.

मनपा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत येथील गांधी मैदानात झाली. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून भयमुक्तीची भाषा केली जाते, मात्र येथे तुमचेच भय आहे. नगर शहर भयमुक्त केले जाईल.


मी कोणाचीही गय करणार नाही. मी धमकी देत नाही, तर कायद्याप्रमाणे काम करणारा माणूस आहे. बेकायदेशीर काम करणार्‍यांना कायद्याचा दंडुका दाखविला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. मनपात आमची सत्ता नसतानाही नगर शहराला कोट्यावधींचा निधी दिला आता भाजपच्या हाती एकहाती सत्ता द्या, नगर शहराचा चेहरामोहरा बदलुन टाकू, असेही ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.