दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, चार जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळया अपघातांत दोनज़ण ठार तर चारज़ण ज़खमी झाले. श्रीकृष्ण कल्याण जाधव ऊर्फ बामदळे (वय ३०) रा.बामदळेवडा, ता. पाटोदा. जि. बीड व विलास प्रकाश मगर, (वय २५) लेन्हेवाडी, ता. जामखेड असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 


Loading...
पहिला अपघात हा मंगळवार, दि. ४ डिसेंबर रोजी रात्री नऊ वा.च्या सुमारास जामखेड नगर रोडवरील हिमालय पेट्रोल पंपाजवळ घडला. यामध्ये दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात श्रीकृष्ण कल्याण जाधव ऊर्फ बामदळे (वय ३०) रा. बामदळेवडा, ता.पाटोदा.जि. बीड, हा जागीच ठार झाला तर अशोक रंगनाथ चव्हाण (वय २४) रा. पाटोदा. जि. बीड व मनोहर डोके वय ४५ व त्यांचा मुलगा हणुमंत मनोहर डोके (वय १८) रा.आष्टी. जि. बीड हे तिघे जण गंभीर जखमी झाले.

ज़खमीना जामखेड येथील ग्रामीण आणले असता, डॉक्टरांनी श्रीकृष्ण जाधव यास मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जखमींवर जामखेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.