नऊ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाची भीती


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने नऊ डिसेंबरपर्यंत अवकाळीची शक्‍यता वर्तवली आहे. राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात विचित्र प्रकारे चढ-उतार जाणवत आहेत. या वातावरणात देखील गारठा टिकून आहे. तरी देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Loading...

वातावरणातील बदलाची सर्वात अगोदर नोंद नगरमध्ये झाली आहे. नगरमध्ये सोमवारी सर्वात नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे. किमान पारा 10.5 अंश सेल्सिअसवर होता. बुधवारी हाच पारा किमान 15.8 अंश सेल्सिअस एवढा नोंदविला गेला. राज्यात बुधवारी सर्वात नीचांकी पारा नागपूरचा होता. तो 14.5 अंश सेल्सिअस एवढा होता.

ढगाळ वातावरणाबरोबर अवकाळीची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयासह काही भागांमध्ये आठ डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

नऊ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावासाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि तापमानातील वेगवान चढ-उतारांमुळे पीकांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आजारांनी डोकेवर काढले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.