'समृध्दी' नंतर सुरत - हैद्राबाद महामार्ग जिल्ह्यातून जाणार!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी नगर जिल्ह्यातील काही भागात भूसंपादन केल्यानंतर आता सुरत ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गही नगर जिल्ह्यातून जाणार आहे. केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या महामार्गाचे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. 


Loading...
नगर जिल्हा हद्दीत सुमारे १०० किमी लांबीचे काम केले जाणार आहे.. सदरचा राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत केला जाणार असून, जिल्ह्यात १०० किमी लांबीत होणाऱ्या या महामार्गाची रुंदी तब्बल १२० मीटर राहणार आहे. मात्र यासाठी २५० मीटर रुंदीचे भूसंपादन केले जाणार आहे.

सदरचा महामार्ग हा जमिनी पासून सुमारे १५ फूट उंचीवर राहणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील काही गावात सर्व्हेक्षण झाले असून, मागील आठवड्यात लोणी, राहुरी विद्यापीठ, सडे, खंडाळा, वांबोरी ते नगर तालुक्यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, शेंडी - पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी, ते वाळुंज पर्यंत सर्व्हेक्षण करण्यात येवून सिमेंटचे ब्लॉक लावण्यात आले आहे.


या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची बागायती जमीन जाणार आहे. काही शेतकरी तर भूमिहीन होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला आतापासूनच शेतकऱ्यांचा विरोध होण्यास सुरुवात झाली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.