मुख्यमंत्र्यांकडे राम शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्याला दिल्यामुळे ते वादात सापडले आहेत.

नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधक तसेच शेतकरी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सोशल मिडीयावर पालकमंत्री राम शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

Loading...
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राम शिंदे यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचा निषेध करतो व राम शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने बडतर्फ करावी ही मागणी आम्ही करतो असे ट्वीट करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

काल मंगळवारी पाथर्डी पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावासाठी जनावरांच्या छावण्या व रोजगार हमीचे कामे सुरु करण्यात याव्यात या मागणीसाठी नगरसेवक रमेश गोरे यांनी आमदार मोनिका राजळे तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन दिले होते.

त्यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी तुमचे जनावरे पाहुण्याकडे नेउन घाला असे सांगताच उपस्थितामध्ये हशा मोठा पिकला.तालुक्यातील जनता भयाण दुष्काळाच्या झळा सोसत असताना पालकमंत्री व नगरसेवक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विनोद करताना दिसून आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.