महापालिकेत सत्ता असताना सेना-भाजपने कोणती विकासकामे केली - आ.संग्राम जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शिवसेना-भाजपने महापालिकेत सत्ता असताना कोणती विकासकामे केली, ते सांगावे. आपसांत भांडणे करून नागरिकांना झुलवत ठेवण्याचे काम यांनी केले. नगरच्या जनतेने त्यांचा हा डाव ओळखला आहे.


Loading...
सत्ता उपभोगायची, स्वतःचे गल्ले भरायचे, अन् नागरिकांना विकासापासून वंचित ठेवायचे एवढेच काम त्यांनी केले. आम्ही मात्र सत्ता नसतानाही शहरात अनेक भरीव विकासकामे केली. ही विकासकामे आज जनतेसमोर आहेत, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. 

प्रभाग क्रमांक ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार वैशाली बनसोडे, पोपट बारस्कर, स्वाती कातोरे, कुमार वाकळे यांच्या प्रचार रॅलीत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे आदी उपस्थित होते. 


जगताप म्हणाले, नगरसेवक कुमार वाकळे यांनी प्रभागात मोठी विकासकामे केलेली आहेत. आमदार निधीतून या भागासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आघाडीने प्रभागात सक्षम उमेदवार दिलेले आहेत, असेही आमदार जगताप यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले, शहरात असा एकही प्रभाग नाही, जिथे आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांनी निधी दिला नाही. सगळीकडे त्यांनी निधी दिला. आमचा महापौर असताना विविध विकासकामे झाली. विरोधकांनी मात्र सत्ता असूनही कामे केली नाहीत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Loading...
Powered by Blogger.