...तर विखे पाटलांचे जिल्ह्यात आणि शरद पवारांचे राज्यात बळ वाढेल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे शिर्डीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणू या ग्वाहीबरोबरच पारनेर, नेवासे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांनी सहकार्य केल्यास शरद पवार यांचे केंद्रात, तर विखे यांचे राज्यात बळ वाढेल, असे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले. 


Loading...
शिर्डीतील नेते व कार्यकर्त्यांची मने गायकवाड सध्या जाणून घेत आहेत. शिर्डी राखीव झाल्यानंतर पहिली निवडणूक अॅट्राॅसिटीच्या मुद्यावर झाली. दुसरी उमेदवारांच्या पक्ष अदलाबदलावर झाली. आता ही निवडणूक स्थानिक उमेदवार की, बाहेरील या मुद्यावर होणार आहे. 

खासदार सदाशिव लोखंडे यांनी मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणावर व समन्यायी पाणीवाटप कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असताना त्यांना ते केले नाही, असे गायकवाड म्हणाले. मागील वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या ताठर भूमिकेमुळे लोकसभेच्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. 


शरद पवार, राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांना अशी भूमिका परवडणारी नाही. मतभेद दूर करून त्यांनी एकत्र आले पाहिजे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आपसात अदलाबदल करणे दोन्ही पक्षांना सोयीचे आहे. 


अकोले सोडल्यास अन्य मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य आहे. शिवसेना व भाजपला बेस नाही. दोन्ही काँग्रेसला शत्रू कोण हे माहीत असताना पूर्वीची भूमिका घेतल्यास दोघांचाही तोटा आहे. आंबेकडरवादी मंडळी रामदास आठवलेंवर नाराज आहेत. आठवले यांची विचारधारा या मंडळींना मान्य नाही. त्यांच्यावर समाजाचा भरवसा राहिलेला नाही. कधी पक्ष सोडून जातील, याचाही भरवसा नाही. असे ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.