एसटी बसच्या वाहकाला बेदम मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एसटी बस जातेगावातूनच न्यावी, असा आग्रह बसमधील महिलेने वाहकाकडे केला. आठवडे बाजाराची गर्दी असल्याने बस गावातून नेता येणार नाही, असे वाहकाने सांगताच महिलेने गावातील तरूणांना बोलावून वाहकास बेदम मारहाण केली. 


Loading...
वाहकांच्या खिशातील २७१४ रूपये व मोबाइलही लांबवण्यात आला. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून दोघांवर शासकीय कामकाजात अडथळा आणणे, लूटमार करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले. 

४ डिसेेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे-कळंब एसटी (एमएच २० बी एल ४१११) बस जातेगाव शाळेजवळ आली असता बसमधून प्रवास करणाऱ्या रेखा रावसाहेब वाणी हिने बस गावातून न्या, असे सांगितले. 


त्यावर वाहक रमाकांत विठ्ठल खामकर (वय ५७, भूम, जि. उस्मानाबाद) म्हणाले, आज जातेगावचा आठवडे बाजार असल्याने बस गावातून नेता येणार नाही. त्याचा राग येऊन महिलेने गावातील नाना गायकवाड याला बोलावून घेतले. 


गायकवाड व त्याच्या साथीदाराने वाहक खामकर यांच्या कमरेवर व पाठीवर मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या शर्टचा खिसा फाडून २७१४ रूपये व मोबाइल हिसकावून घेण्यात आला, अशी फिर्याद वाहक खामकर यांनी जामखेड पोलिस ठाण्यात दिली. 


त्यावरून पोलिसांनी आरोपी आर. आर. वाणी व नाना गायकवाडच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, लूटमार करणे आदी कलमान्वये रात्री उशिरा दाखल करण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Loading...
Powered by Blogger.