सुरेश हावरे साई संस्थानचे विश्वस्त की मालक ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरेंनी राज्य शासनाला सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी ५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले. त्याच्या परतफेडीची मुदतही ठरवलेली नाही. अाधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या सरकारकडून हे कर्ज फिटण्याची अपेक्षा करणे म्हणजे चमत्कारच मानावा लागेल. 


Loading...
म्हणजे हावरे यांनी ५०० काेटींचे दानच सरकारच्या पदरात टाकले अाहे. मात्र हा पैसा हावरेंच्या मालकीचा नाही. ते संस्थानचे विश्वस्त अाहेत की मालक? कुणाला विचारून त्यांनी कर्जाचा निर्णय घेतला, असा सवाल हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे. 

प्रसिद्धिपत्रकात घनवट यांनी म्हटले की, 'मंदिरांचे विश्वस्त 'भक्त' नसतील तर देवनिधीची कशा प्रकारे लूट होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. शासनाला सिंचन प्रकल्पासाठी पैशाची आवश्यकता असेल तर राज्य चालवणारा भाजप ६३०० कोटी रुपयांचा स्वतःचा पक्षनिधी का वापरत नाही? देवनिधीची लूट हे महापाप असून ते लुटणाऱ्यांना फेडावेच लागेल. 


सरकारने अाजवर अनेकदा मंदिरांचा पैसा घेतला; मात्र एकदाही वक्फ बोर्डाकडून किंवा ख्रिस्तीच्या संस्थांकडून दमडी घेण्याची हिंमत दाखवली नाही. हिंदूंच्या विरोधाला न जुमानता मंदिरांची लूट चालूच ठेवली आहे. त्यामुळे आता हिंदू जनजागृती समिती हिंदूंनी मंदिरांमध्ये पैसे अर्पण न करता 'मंदिर सरकारीकरण रद्द करा, मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी वापरा!' अशा आशयाच्या चिठ्ठ्या टाकून निषेध आंदोलन करणार अाहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.