मुख्यमंत्री फडणवीस नगरमध्ये काय बोलणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले आहे. आता प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असून भाजपच्या प्रचार मोहिमेची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे. 

Loading...
७ डिसेंबरला दुपारी तीन वाजता गांधी मैदानात भाजपने 'विराट विजय संकल्प सभे'चे आयोजन केले असून, या सभेत मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार दिलीप गांधी व जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी गांधी मैदानाची पाहणी केली.

नगरच्या महापालिकेसाठी येत्या ९ डिसेंबरला मतदान होणार असून आतापर्यंतच्या प्रचारात भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाले आहेत. ७ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेत ते काय बोलतात याकडे नगरकरांचे, तसेच विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.