नगराध्यक्ष अनुराधा आदिक कार अपघातातून थोडक्यात बचावल्या !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी नगरला जात असताना नांदगावनजीक नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या मोटारीला बुधवारी दुपारी अपघात झाला. सुदैवाने त्यातून त्या बचावल्या.

Loading...
याबाबत सविस्तर असे कि,मंगळवारी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत नगरला होणाऱ्या बैठकीसाठी आदिक निघाल्या होत्या. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अर्चना पानसरे, स्वीय सहायक अविनाश पोहेकर होते. 

या वेळी त्यांच्या मोटारीला नांदगाव नजीक पाठीमागून आलेल्या टेम्पोची धडक बसली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून गाडीवर लगेच नियंत्रण मिळवले. पोहेकर यांना मुका मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. नगराध्यक्ष आदिक मात्र बचावल्या. अपघातानंतर आदिक व पानसरे बैठकीसाठी नगरला गेल्या. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.