सिव्हिलमध्ये पोलिसास शिवीगाळ व दमदाटी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना सविस्तर माहिती न देता उलट त्यांनाच शिवीगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की केली. तसेच हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा केला. ही घटना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी घडली. 
Loading...

याबाबत सविस्तर असे की, एका विवाहितेने कसल्यातरी गोळ्या खाल्ल्याने प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने तोफखाना पोलिस संबंधित महिलेचा जबाब घेवून व याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले असता. 


संबंधित महिला अतिदक्षता वॉर्डमध्ये ॲडमिट केलेली असून, तिच्या पतीकडे पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती देण्याऐवजी पोलिसांनाच दमदाटी करून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार शिवनाथ बडे हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.