श्रेय वादावरून भाजप व राष्ट्रवादीत जुंपली !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वीजबिलाच्या थकबाकीमुळे बंद असलेल्या तालुक्यातील शहरटाकळी व २४ गावे आणि हातगाव व २९ गावे या दोन प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून मार्गी लावल्या असून, आज या योजनेच्या राक्षी येथील उद्भवावर जाऊन शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जलपूजन केले.
Loading...

या दोन्ही योजना सुमारे एक कोटी ६६ लाख रुपयांची वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे अनेक महिन्यांपासून बंद होत्या. आ. राजळे यांनी याबात शासन स्तरावर पाठपुरावा करून थकबाकीच्या ५० टक्के रक्कम शासनाला भरावयास भाग पाडले व उर्वरित ५० टक्के रकमेचे ३० हप्ते पाडले,त्यातील ४ लाख रुपयांची रक्कम संबधित पाणी योजनेत सहभागी असणाऱ्या समितीने भरल्यामुळे वीजपुरवठा सुरू झाला.


या योजना बंद असल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टंचाई असणाऱ्या गावांना ८० टंॅकरने १७० खेपा शेवगाव -पाथर्डी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या खंडोबा माळ येथील टाकीवर भरल्या जात होत्या. पाणी कमी पडत असल्याने शेवगाव व पाथर्डी शहरात ८ ते १० दिवसांनी पाणी मिळत होते. 


म्हणून दोन्ही नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरटाकळी योजनेचा उद्भव लवकर सुरू करण्याची मागणी आ. राजळे यांच्याकडे केली होती. ही योजना सुरू झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आमदार राजळे यांचे आभार मानले. आज या योजनेच्या राक्षी येथील उद्भवावर पाणी आले व त्याचे जलपूजन भाजप कार्यकर्त्यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.