शेजार्‍याने चिमुरडीला पाजली दारू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दीड वर्षाच्या मुलीला एका इसमाने स्वतःच्या घरात नेऊन तिला दारू पाजल्याची घटना तालुक्यातील धामोरी येथे घडली. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपीने मुलीच्या वडिलांना दिली. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 


Loading...
मुलीचे वडिलांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास माझ्या मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने तिला शोधात मी आवाजाच्या दिशेने गेलो असता ती प्रदीप वसंत अहिरे याच्या घरामध्ये रडत होती.प्रदीप तिला दारू पाजीत होता. ही घटना पहिल्यानंतर प्रदीप याला जाब विचारला. 

लहान मुलीला दारू का पाजत आहे. तिच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. याचा राग आल्याने प्रदीपने वडील ज्ञानेश्वर व मला शिवीगाळ केली. वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली. आम्ही मुलीला उचलून घेतले असता तिच्या तोंडाचा दारूचा वास येत होता. 

तिला उभेही राहता येत नव्हते. तिला घेऊन आम्ही कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आलो. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर मुलीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. संतोष धोंदमल यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप वसंत अहिरे याच्या विरुध्द भादंवि कलम 328,323 ,504 ,506 बाल अधिनियम 2000 चे कलम 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रदीप याला अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.