प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून धमकी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून धमकी दिल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून याबाबत दहा जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद तोफखाना पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.3) करण्यात आली.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रजिया बाबासाहेब शेख (रा. नंदनवन कॉलनी टिळक रोड, अ.नगर) व त्यांची मैत्रीण प्रचारासाठी गेले असताना त्यांना सुनिल काळे (पुर्ण नाव माहित नाही) व त्यांचे दोन अनोळखी साथीदार (रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) यांनी नगर-कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपाजवळ रस्त्यात अडवून तुम्ही शिवसेनेचा प्रचार करता का? असे म्हणून त्यांना शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक कारवाई महिला पोलिस उपनिरीक्षक पांढरे या करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत अभिजीत अशोक काळे (रा. आगरकर मळा, स्टेशन रोड, अ.नगर) यांना अमोल घोडके (पुर्ण नाव माहित नाही, रा. अ.नगर) व त्याचे दोन अनोळखी जोडीदार यांनी तारकपूर येथे अडवून वार्ड १५ मध्ये जास्त फिरायचे नाही. नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी काळे यांच्या फिर्यादिवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.

तिसऱ्या घटनेत प्रभाकर शिवाजी पंडीत (रा. शेंडी-पोखर्डी) हे मनपा निवडणुकीतील उमेदवार गितांजली काळे यांच्या गाडीवर चालक असून रविवारी (दि.२) रात्री काळे यांना घरी सोडून स्वत:चे घरी जात असतांना औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलसमोर चार अनोळखी इसमांनी अडवून तू काळे यांच्याकडे उद्यापासून ड्रायव्हर म्हणून काम करायचे नाही. नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकू असे म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Loading...
Powered by Blogger.