महापालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन करेल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपत गट-तट असल्याची चर्चा या केवळ अफवाच आहेत. विरोधकांकडून निवडणुकीच्या काळात जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. शहर भाजप एकसंध असून महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन करू, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर यांनी केला. 


Loading...
प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर, चंद्रकांत पाटोळे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सुरेखा खैरे यांच्या प्रचारार्थ अॅड. आगरकर यांनी ठिकठिकाणी बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेतही भाजपाची सत्ता आल्यास केंद्र व राज्य सरकारकडून शहराच्या रखडलेल्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होवू शकणार आहे. 


भाजपने गेल्या ४ वर्षांत जनहिताच्या घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांना हे आपले सरकार वाटत आहे, त्यामुळेच आजपर्यंत राज्यात झालेल्या सर्व महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली आहे, असे अॅड. आगरकर म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.