ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एमएच ४१ एए ६९५३ हा ट्रॅक्टर महामार्गावरून कोपरगावकडून शिर्डीकडे जात असताना शेतात घुसून उलटला. त्यात ट्रॅक्टरचालक हा जागीच ठार झाला आहे; मात्र त्याचे नाव कळू शकले नाही. 

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत मयत ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अमित साहेबराव खोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर २४०/२०१८ नुसार भादंवि कलम ३०४, २७९, ४२७, मोटर वेहिकल ॲक्ट १८४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अशोक गवसणे करीत आहेत.

----------------------------


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.