कालव्यांसाठी साई संस्थानकडून 125 कोटींचा पहिला हप्ता मंजूर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणांचे कालवे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. आता या कामासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानकडून पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


Loading...
त्याचा पहिला हप्ता 125 कोटी रुपये या कामासाठी जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली आहे. विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी स. पु साळुंके यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश काढण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. 

यासाठी प्रकरणांचा मोठ्या प्रमाणांत पाठपुरावा केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे करण्यांत आल्याचेही त्यांनी सांगितले.

या निर्णयाचा फायदा कोपरगाव तालुक्‍यातील मनेगाव, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, जवळके, बहादरपूर, शहापूर, बहादराबाद, वेस, सोयगाव, निमगाव व काकडी या जिरायती गावांना होणार आहे.या अकरा गावांतील पाच हजार 666 हेक्‍टर म्हणजेच 14 हजार 165 एकर क्षेत्र संचनाखाली येणार आहे. 

साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ कोल्हे म्हणाले, निळवंडे धरण व कालव्यांची कामे रखडल्यामुळे ते मार्गी लागावेत, यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा रास्तारोको आंदोलने केली.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.