महिलेचा विनयभंग करून मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करुन तिला काठीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. 
Loading...

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदरची महिला आपल्या कुटुंबासोबत वरील ठिकाणी राहत आहे. तिचा मोठा दिराने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.


त्यानंतर तिला पोटावर व मांडीवर काठीने मारत तोंडावरही हाताने मारुन शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी दिराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.