भाजप म्हणजे 'भामटा जगला पाहिजे' !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनतेने विचार करून आता निर्णय घेतला पाहिजे. शिवसेना लोककल्याणाचे तसेच लोक हिताचे काम करते. केडगावमध्ये एका रात्रीत काँग्रेसचे सगळेच भाजपात गेले. २५ वर्षे शिवसेनेची भाजप बरोबर युती होती, पण भाजप अटलबिहारीची आणि विचारांवर चालणारी होती. आताची भाजप म्हणजेच 'भामटा जगला पाहिजे' अशी टिका व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी केली.

प्रोफेसर चौकात सोमवारी रात्री बानगुडे यांची तोफ धडाडली. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनशाम शेलार, विधानसभा समन्वयक सुमित कुलकर्णी, विना बोज्जा, कलावती शेळके, पराग गुंड, जयंत येलूरकर, योगीराज गाडे, बल्लू सचदेव, कमल दरेकर, संगीता केरुळकर, श्रीनिवास बोज्जा, काका शेळके, रावजी नांगरे आदींसह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.