भावाच्या मृत्यूची बातमी एकूण मोठ्या भावाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एका भावाची मृत्यूची बातमी समजताच दुसऱ्या भावाला धक्का बसल्याने त्याचाही मृत्यू झाल्याची घटना नेवासे तालुक्यातील नजीक चिंचोली येथे घडली. या घटेनमुळे गावावर शोककळा पसरली. सचिन चावरे (वय २१) व शुभम चावरे (वय १९) अशी या सख्ख्या भावांची नावे आहेत. 
Loading...

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासे तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी पोपट सीताराम चावरे (वय ५०) यांचा लहान मुलगा शुभम हा नगर येथे एमबीएचे शिक्षण घेत होता. मंगळवारी (४ डिसेंबर) सकाळी ५ च्या सुमारास कॉलेजमध्ये गेला असता पायऱ्या चढताना तो पाठीमागे पडला. 

त्याला तातडीने नगर सिव्हिल हिस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; परंतु, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले. शुभमच्या मृत्यूची बातमी नजीक चिंचोली येथे घरी असलेला शुभमचा मोठा भाऊ सचिन याला समजली. 

शुभमच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सचिनची प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला दुपारी २ च्या सुमारास प्रथम भेंडा व त्यांनतर नेवासे फाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, सचिनचे उपचारापूर्वीच निधन झाले. नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुभमचे शवविच्छेदन तर नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात सचिनचे शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह नजीक चिंचोली येथे आणण्यात आले. 

सायंकाळी ५ च्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील आणि सख्ख्या भावांचे एकाच दिवशी निधन होण्याच्या घटनेमुळे नजीक चिंचोली गावावर शोककळा पसरली. सचिन, शुभम, आई-वडील व दोन बहिणी असा हा परिवार होता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.