जामखेडमध्ये महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड येथील तपनेश्वर गल्लीत राखी राजेश विरमणी या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने त्यात ती शंभर टक्के भाजली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.३ डिसेंबर) घडली. 
Loading...


याबाबत सविस्तर असे की, राखी उर्फ (बाणी) राजेश विरमानी (वय ४० वर्षे, रा.सर्जेपुरा.अहमदनगर हल्ली.रा.तपनेश्वर गल्ली, जामखेड) या महिलेने आपल्या रहात्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत ती शंभर टक्के भाजल्याने तीचा जागीच मृत्यू झाला.

मयत राखी विरमानी ही महिला काही वर्षांपासून आपल्या माहेरी आपला भाऊ राजेंद्र आहुजा यांच्या घरी रहात होती. सोमवार दि.३ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तीचे भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. या वेळी तीची आई व ती स्वत: या दोघीच घरी होत्या. 

त्यानंतर काही वेळातच तीने घरातील बाथरुममध्ये अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या वेळी तीने आरडा ओरडा केल्यामुळे तीची आई तीला विझवण्यासाठी धावत आली. त्यावेळी तीला विझवत असताना तीच्या आईचा हात भाजल्याने ती देखील जखमी झाली. 

सदर घटनेची माहिती समजताच केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माउली गायकवाड यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमी महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ती शंभर टक्के भाजल्याने तीचा जागेवरच मृत्यू झाला होता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.