नगरमध्ये राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच वातावरणातील किमान पारा मात्र राज्यात नीचांकी नोंदविला गेला आहे. नगरच्या किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. 
Loading...

राज्यात सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नगर खालोखाल पुण्याचे 12.8, औरंगाबादाचे 13.3 व नाशिकचे 13.6 अंश सेल्सिअस एवढा किमान तापमान नोंदविले गेले आहे.नगरच्या या तापमानात उद्या काहीशी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते. 

त्यामुळे किमान पारा काहीसा सुधारून तो मंगळवारी 12 अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकतो. ही थंडी बोचरी असून, त्यामुळे थंडी-ताप, सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्‍शनसारख्या आजारांना निमंत्रण मिळू शकते.लहान मुलांना ही थंडी झोंबू शकते. 

त्यामुळे त्यांना गरम कपडे वापरण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत. संधिवाताच्या रुग्णांना या थंडीमुळे त्रास होऊ नये म्हणून गरम कपडे परिधान करावेत. त्वचेला अधिक त्रास देणारी ही थंडी आहे. त्याचीही काळजी घेण्याचा सल्ला डॉक्‍टर देत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.