श्रीगोंद्यात आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या पुजाऱ्याला अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  खंडोबा मंदिराचा पुजारी काशीनाथ बाबूराव राऊत (वय ६५) याने अादिवासी मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे ती गर्भवती राहिली. या मुलीने आई-वडिलांना बरोबर घेऊन पोलिसांकडे रविवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पोलिसांनी अटक केली. 
Loading...

तीन वर्षांपासून ही मुलगी प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी काही प्रतिष्ठितांच्या घरी धुणी-भांडी करत होती. लोक पैसे व कपडेही द्यायचे. भाजी मंडईतील मुलीकडे कपडे शिवण्यासाठी ती गेली असताना तिचे वडील काशीनाथ याने तू आमच्याकडे रहा. मी तुला सांभाळतो, असे सांगितले. 

तिने नकार दिल्यानंतर त्याने गैरवर्तन करुन अत्याचार केला. कुणाला सांगू नको, अन्यथा जीवे मारीन, अशी धमकी दिली. नंतर आरोपीने मुलीला खंडोबा मंदिरात बोलावून उसाच्या शेतात वेळोवेळी अत्याचार केले. काही दिवसांनी पोटात वेदना होऊ लागल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. 

मी हे कृत्य केले नाही, मी पुजारी आहे, नाव घेतले तर जीवे मारीन अशी धमकी काशीनाथने दिली. मुलीने सर्व हकिकत कथन केल्यावर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने उडवाउडवी केली, पण पोलिसांनी वर्दीचा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.