या ठिकाणी होणार मनपा निवडणुकीची मतमोजणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मनपा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी यंदा शहरातील भवानीनगरमधील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मतमोजणी होणार असल्याने पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.
Loading...

मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 9 डिसेंबर रोजी मतदान होत असून दि. 10 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मतमोजणी करण्यासाठी मनपा अधिकार्‍यांकडून विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली. 


एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये जागा उपलब्ध नसल्याने भवानीनगरमधील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी करण्याचे प्रशासनाकडून निश्‍चित करण्यात आले आहे. 

दरम्यान, शहरातील मागील काही घटनांमुळे मनपा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जोरदार पावले उचलण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशीही कडक बंदोबस्ताचे पोलिसांकडून नियोजन करण्यात आले असून दुसर्‍या दिवशी शहरातच मतमोजणी होणार असल्याने कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.