सावेडीत शिवसेना उमेदवारांचा फ्लेक्स फाडला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडी उपनगरातील श्रमिकनगर येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेला फ्लेक्स बोर्ड अज्ञातांकडून फाडण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.महापालिका निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचारासाठी थोडाच कालावधी उरला आहे. यातूनच किरकोळ वादाचे प्रकारही घडत आहेत. 


Loading...
सावेडी उपनगरातील श्रमिकनगर येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या संपर्क कार्यालयासमोर लावलेला फ्लेक्स रात्रीतून फाडण्यात आल्यामुळे काही काळ तणावाचे निर्माण झाले होते. रविवारी (दि.२) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवसेना कार्यकर्ते विशाल धायक यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.